श्रीलंका प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

मुंबई : गेल्या महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआयने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित केली होती. मात्र काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याची घोषणा केली होती. यादम्यान श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लंका प्रीमिअर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड संचालीत लंका प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेचे आयोजन हे येत्या ३० जुलै ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामात श्रीलंकेतील ५ शहराच्या नावाने संघाचा समावेश केला होता. या पाच संघादरम्यान एकुण २३ सामने खेळवले गेले होते. या सत्रातही सामन्याची संख्या इतकिच राहणार आहे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत जाफना स्टॅलियन्सने या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते.

जाफना स्टॅलियन्सने अंतिम सामन्यात गॅले ग्लेडिएटर्सविरूद्ध ५३ धावांनी विजय मिळविला होता. मागीलवर्षी झालेल्या पहिल्या सत्रात वनिंदू हसरंगा याला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. त्याने सर्वाधिक १७ गडी बाद केले होते. कोरोना परिस्थीतीमुले स्पर्धा बायोबबलमध्येच खेळवली गेली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सत्रामध्ये इरफान पठाण, मुनाफ पटेल आणि सुदीप त्यागी हे भारतीय खेळाडू सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP