श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रकरण, ‘या’ अटीसंह खेळाडू इंग्लंडला जाण्यास तयार

मुंबई : क्रिकेटमध्ये एकेकाळी दिग्गज संघ म्हणून ओळख असलेला श्रीलंका संघ गेल्या काही काळापासुन चागंली कामगीरी करण्यात आपयशी ठरत आहे. संघातील वरिष्ट खेळाडू निवृत्त झाल्यानंतर संघाची कामगिरी खालावत चालला आहे. यातच श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंना वाद आता चव्हाट्यावर आला होता. मात्र आता हा वाद काही अंशी संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्रीय खेळाडूंनी क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक करारावर नकार दिला होता. खेळाडुंना मिळणारी रक्कम ही इतर देशातील खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेपेक्षा तीनपटीने कमी असल्याचा आरोप खेळाडूंनी केला होता. मात्र आता खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यास तयार झाले आहेत. मात्र खेळाडुंनी या दौऱ्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर ते कोणत्याही करारावर स्वाक्षरी न करताच जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंकेचे खेळाडु हे केवळ देशप्रेमापोटी जाणार आहे.

या दौऱ्यावर जाताना खेळाडुंनी एका घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. यात ते स्वत:च्या इच्छेने इंग्लंड दौऱ्यावर जात आहे असा उल्लेख आहे. मात्र यात खेळाडुंना मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल काहीच उल्लेख नाही. गुरुवारी १० जून रोजी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यात श्रीलंका संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. येत्या २३ जुनपासुन या दौऱ्याला सुरूवात होईल.

महत्वाच्या बातम्या

IMP