सात वर्षांनंतर पुन्हा मैदानावर उतरून पहिली विकेट घेताच भावूक झाला श्रीसंत; ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ

srisant

मुंबई : सात वर्षानंतर भारताचा फास्ट बॉलर एस श्रीसंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी केरळच्या टीमच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत श्रीसंतची निवड करण्यात आली होती. या टी-20 स्पर्धेसाठीच्या कॅम्पमध्ये श्रीसंत संजू सॅमसनसोबत सहभागी झाला. क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याची श्रीसंत आतुरतेने वाट बघत होता. आता 2023 वर्ल्ड कप खेळणं हे आपलं अंतिम लक्ष्य असल्याचं श्रीसंत म्हणाला आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत श्रीसंत केरळ संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहे. त्यानं पहिल्याच सामन्यात चार षटकांत २९ धावा देताना एक विकेट घेतली. त्यानं पुद्दुचेरी संघाचा फलंदाज फाबिद अहमद याचा त्रिफळा उडवला. इतक्या वर्षानंतर मैदानावर उतरून पहिली विकेट घेतल्यानंतर श्रीसंत भावूक झाला. श्रीसंतने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

श्रीसंतने ऑगस्ट 2011 साली भारतासाठी आणि 2013 साली शेवटची प्रथम श्रेणी मॅच खेळली होती. 37 वर्षांचा श्रीसंत अडचणी आणि अनेक आरोपांनंतर क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. लिएंडर पेस, रॉजर फेडरर आणि सचिन तेंडुलकर आपलं प्रेरणास्थान आहे, असं श्रीसंत म्हणाला. त्याने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. ‘या वयात खेळ जगतात तुमच्यामध्ये काही खास शिल्लक नसतं, ही खरी गोष्ट आहे, पण पेसने वयाच्या 42 व्या वर्षी ग्रॅण्ड स्लॅम जिंकला, हीच गोष्ट रॉजर फेडररचीही आहे,’, अशी प्रतिक्रिया श्रीसंतने दिली.

महत्वाच्या बातम्या