चाहत्यांसाठी खुशखबर ! भारताचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू करतोय मराठी चित्रपटात एन्ट्री

sreesanth

मनोरंजन : एकेकाळी भारताचा वेगवान गोलंदाज असलेला श्रीसंत आता चित्रपटांमधून झळकू लागला आहे. तर येत्या दिवसात तो मराठी चित्रपटात देखील दिसणार आहे. याबाबत खुद्द श्रीसंतने माहिती दिली आहे. हेलो (Helo) अ‍ॅपवर लाइव्ह असताना त्याने मराठी चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले.

आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत श्रीसंत नेहमी वादाच्या भोवऱ्यात होता. त्याने क्रिकेटमध्ये फिक्सिंग केल्याने त्याला आजीवन क्रिकेट खेळण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे श्रीसंत खेळापासून दूर जात त्याने आता सिनेमाच्या दुनियेत प्रवेश केला आहे. त्याने आतापर्यंत 2017 मध्ये ‘अक्सर-2’ हा सिनेमा केला. त्यानंतर श्रीसंत बिग बॉसमध्ये देखील दिसला होता.

आता तर श्रीसंत चक्क मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्याने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे. आतापर्यंत मी ज्या काही भूमिका केल्या त्यातील ही भूमिका सर्वोत्तम असणार आहे. या मराठी चित्रपटाचे नाव देखील त्याने घोषित केले. या चित्रपटाचं नाव ‘मुंबईचा वडापाव’ असल्याची माहिती श्रीसंत याने दिली आहे. दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग पुणे आणि नाशिक याठिकाणी होण्याची शक्यता आहे.

क्रिकेटसाठी श्रीसंतवर आजीवन बंदी

आयपीएल-६ मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत दोषी ठरला होता. त्याच्याबरोबर अन्य सहकारी देखील होते. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीसंतवर खटला चालवत त्याच्या खेळण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. त्याच्यासोबत राजस्थान रॉयलमधील अंकित चव्हाण, सिद्धार्थ त्रिवेदी, अमितसिंग हे खेळाडू देखील होते.