आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाचा बोलबाला

लोकेश राहुल पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने आपले पहिले स्थान दोन गुण कमावत अजून भक्कम केले आहे. तर सलामीवीर लोकेश राहुलने 2 स्थानांनी झेप घेतली असून कसोटी कारकीर्दीत फलंदाजांच्या यादीत पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तो 9व्या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर सलामीवीर लोकेश राहुलनं कसोटी कारकीर्दीत फलंदाजांच्या यादीत पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे.राहुलसोबत टॉप टेनमध्ये फलंदाजांच्या यादीत भारताच्या चेतेश्वर पुजारा (4), विराट कोहली (5) आणि अजिंक्य रहाणे (10) यांचा समावेश आहे. तर शिखर धवनने 38व्या स्थानावरून 28व्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जाडेजा पहिल्या स्थानावर तर रविचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने 96 चेंडूंमध्ये 108 धावा फटकावल्यामुळे तो 68 व्या क्रमांकावर आहे. तर शमीलाही एका क्रमांकाचा फायदा झाला असून तो 19व्या क्रमांकावर आला आहे. उमेश यादवलाही एका क्रमांकाचा फायदा झाल्याने त्याला 21व्या क्रमांकावर बढती मिळाली आहे. उमेशचे हे कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग ठरले आहे.

आयसीसी रँकिंगमध्ये पहिले 3 कसोटी संघ

1) भारत 2) दक्षिण आफ्रिका 3) इंग्लंड

टॉप 3 कसोटी फलंदाज

1) स्टीव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया 2) जो रूट – इंग्लंड 3) केन विलियम्सन – न्यूझीलंड

टॉप 3 कसोटी गोलंदाज

1) रविंद्र जाडेजा – भारत 2) जेम्स एंडरसन – इंग्लंड 3) रविचंद्रन अश्विन – भारत

टॉप 3 कसोटी अष्टपैलू

1) शाकीब अल हसन – बांग्लादेश 2) रविंद्र जाडेजा – भारत 3) रविचंद्रन अश्विन – भारत

You might also like
Comments
Loading...