शाकाहाराचे पुरस्कर्ते आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे निधन

dadasa vaswani

 

पुणे: साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि शाकाहाराचे पुरस्कर्ते दादा वासवानी यांचे आज पुण्यामध्ये निधन झाले आहे, वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव साधू वासवानी मिशन येथे ठेवण्यात येणार आहे.

दादा वासवानी याचं पूर्ण नाव जशन पहलराज वासवानी होत, २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे झाला होता. दादा वासवानी यांनी आजवर अनेक भाषांमध्ये पुस्तकाचं लिखाण केल आहे. ते शाकाहाराचे पुरस्कर्ते होते.

तीन दिवसांपूर्वी दादा वासवानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दादा वासवानी यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत यांना शुभेच्छा दिल्या होत्या.