‘स्पायडर मॅन स्पायडर मॅन…’ जाणून घ्या का होतोय पंत ट्रोल

पंत

ऑस्ट्रेलिया : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्‍यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच वायरल होत असते. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील पंतचे एक नवे रूप बघायला मिळाले असून यावेळी तो गाणं गात असताना दिसला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन व कॅमेरॉन ग्रीन फलंदाजी करत असताना पंत ‘स्पायडरमॅन’ हे गाणं म्हणत होता. स्टम्पमाइकमध्ये आलेल्या आवाजानुसार पंत , ‘स्पायडर मॅन स्पायडर मॅन , तुने चुराया मेरे दिल का चैन.’ हे वाक्य गात होता. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट फॅन्स देखील त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचे समालोचन करताना वॉर्न यांनी सहकारी केरी ओकिफी यांच्यासोबत मिळून रिषभ पंतची थट्टा केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांनाच सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या