भाषणाने समाज बदलणार नाही आधी भुकेल्याना जेवण द्या – अण्णा हजारे

पुणे : ‘सध्या देशात निवडणुकांमध्ये  दोन-दोन तास भाषण दिली जात आहेत. मात्र उपाशी लोकांना भाषण देवून काही होत नाही. भाषणाने समाज बदलणार नाही तो बदलण्यासाठी लोकांना आधी जेवण देन गरजेच आहे. तसेच समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर केवळ भाषण देऊन चालणार नाही. तर कथनी आणि करणीला जोड देन गरजेच असल्याच मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलते वेळी सांगितलं आहे.

अण्णा हजारे मोदींना पत्र लिहिणार

देशाच्या राजकारणात चांगल्या व्यक्ती येण गरजेच आहे सध्या केवळ सत्तेतून पैसा आणि पैस्यातून सत्ता मिळवली जात असल्याच दिसत आहे. त्यामुळे विधिमंडळ आणि लोकसभेत चारित्रशील नेतृत्व येण्यासाठी  राज्य आणि केंद्रात प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी पतंप्रधान नरेंद्र मोदींना  पत्र पाठवणार असल्याच अण्णा हजारे यांनी सांगितल आहे.