पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिल्या खास शुभेच्छा!

narendra modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ वा वाढदिवस आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने भाजपने देशातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षातील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील तसेच मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातून देखील मोदींवर वेगवेगळ्या अंदाजात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने  सोशल मीडियावर दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकरसह देशभरातून नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच मोदींच्या वाढदिवसा निमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या