नितळ त्वचेसाठी खास टिप्स

टीम महाराष्ट्र देशा : चेहरा गोरापान, नितळ तजेलदार सगळ्यानाच हवा असतो. पण सौंदर्य असून सुद्धा कामाच्या व्यापात आजकालच्या तरुणींना ते जोपासणे शक्य होत नाही. मात्र घरातल्या घरातच असे काही पदार्थ आहेत ज्यांचा वापर केला तर चेहरा टवटवीत दिसतो. आणि चेहऱ्याचा रंग ही बदलतो.

मग वय कोणतेही असो त्या तरुणीला आपण तरून असल्याचा भास होतो. पण हे पदार्थ नेमके कसे वापराचे त्याला काही नियम आहेत. चार चमचे उकडलेले तांदूळ, १ चमचा दुध आणि १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावावं. हे मिश्रण सुकल्यानंतर ते धुऊन टाकावे. यामुळे त्वचा मऊ होते.

तसेच मसुराच्या डाळीची पाच चमचे पेस्ट करून त्यात पाच चमचे कच्चे दुध मिसळावे हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर २० मिनिटांनी धुऊन टाकावे. यामुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते. बटाट्याचा १ चमचा लगदा आणि १ चमचा दही मिसळून चेहऱ्यावर त्याची पेस्ट लावावी. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे

चेहऱ्याचा रंग उजळतो. तसेच १ गाजर किसून त्यात १ चमचा मध मिसळाव. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळून लावावी. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जातो.

महत्वाच्या बातम्या