विशेष पथक लागले कामाला, वाळुचा ट्रक जप्त

परभणी : जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने अवैध वाळूची वाहतुक करणारा ट्रक वसमत रस्त्यावर मंगळवारी  सकाळी जप्त केला. या कारवाईत ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकातील फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अजहर पटेल, अरुण कांबळे, दीपक मुंडे, विष्णू भिसे आदी अवैधधंद्यांची माहिती काढत कारवाईसाठी मंगळवारी सकाळी वसमत रस्त्यावरील एका पेट्रोलपंपासमोर वाळूची अवैधवाहतुक करणारा ट्रक (क्र. एमएच १४ डीजी ०७३८) या पथकास आढळला. पथकाने ट्रकचालकास वाळूबाबत विचारणा केली.

मात्र, ट्रकचालकाने पथकास माहिती देण्यास टाळाटाळ केली. या पथकातील फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचार्‍यांनी हा ट्रक ताब्यात घेतला. जप्त केलेला ट्रक नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज या कारवाईत पथकाने जप्त केला.

महत्वाच्या बातम्या :