विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमाच्‍या पूर्वतयारीचा आढावा ; कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी विशेष दक्षता

टीम महाराष्ट्र देशा : पेरणे फाटा येथील विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रम येत्‍या 1 जानेवारीस होणार असून याबाबतच्‍या पूर्वतयारीचा आढावा राज्‍याचे मुख्‍य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज त्‍यांच्‍या दालनात घेतला. यावेळी गृह सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर, अतिरिक्‍त पोलीस महासंचालक परमवीर सिंग, राज्‍य गुप्‍तचर आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अशोक मोराळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरेगाव भिमा जवळील पेरणे फाटा येथील विजयस्‍तंभाला अभिवादन करण्‍यासाठी अनेक नागरिक येत असतात. गेल्‍या 1 जानेवारीस झालेला प्रकार लक्षात घेवून हा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी विशेष दक्षता घेण्‍यात येत आहे. मुख्‍य सचिव जैन यांनी कार्यक्रम परिसरात उपलब्‍ध करुन देण्‍यात येणा-या सोयी-सुविधांची माहिती घेवून उपयुक्‍त सूचना केल्‍या. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कार्यक्रम स्‍थळ, वाहनांच्‍या पार्कींगच्‍या जागा, अन्‍न-पदार्थांचे स्‍टॉल्‍स, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय,रुग्‍णवाहिका, तात्‍पुरते शौचालये, सीसीटीव्‍ही कॅमेरे आदींची विस्‍तृत माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्‍य विभाग तसेच इतर विभागांच्‍या वतीने करण्‍यात येणा-या कामांची माहिती दिली. पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबतचा आढावा सादर केला. कार्यक्रम शांततेत संपन्‍न होण्‍यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्‍त उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्‍हा पोलीस प्रशासनाच्‍यावतीने योग्‍य ती तयार करण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. सोशल मिडीयावरही विशेष लक्ष ठेवण्‍यात आले असून आवश्‍यकते नुसार कारवाई करण्‍यात येत आहे. समाजातील नागरिकांच्‍या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Loading...

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विजयस्‍तंभ परिसरात स्‍थानिक प्रशासन आणि नागरिकांच्‍या वेळोवेळी बैठका घेवून हा कार्यक्रम शांततेत साजरा करण्‍याचे आवाहन केले. विविध संस्‍था, नागरिकांनी केलेल्‍या सूचनांचा आढावा घेवून त्‍यानुसार योग्‍य पध्‍दतीने नियोजन केल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त करण्‍यात आले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का