बंगळुरूमधील कारागृहात शशिकला यांना विशेष सुविधा ?

ही.के.शशिकला

बंगळुरू : बंगळुरूमधील मध्यवर्ती कारागृहात अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख व्ही.के.शशिकला यांना विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शशिकला तुरूंगाच्या आत – बाहेर जाताना दिसत आहेत. माजी तुरुंग पोलीस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी कर्नाटक पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांकडे सीसीटीव्ही फुटेज सोपवले आहे. रूपा यांनी गेल्या महिन्यात तात्कालीन पोलीस महासंचालक एच.एन. सत्यनारायण राव यांना या संदर्भात एक अहवाल सोपवला होता. शशिकला यांनी कारागृहात विशेष सुविधांसाठी तुरूंग अधिका-यांना दोन कोटी रूपयांची लाच दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. यानंतर सरकारने हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवले होते.Loading…
Loading...