आ.नारायण पाटील : संघर्षाचा वारसा लाभलेला आणि करमाळा तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला लोकनेता

narayan patil

करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा आज वाढदिवस आहे. एक दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे आबा धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जातात. संघर्षाचा वारसा लाभलेला आणि करमाळा तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला हा लोकनेता खडतर असा संघर्ष करून विधानसभेत पोहचला आहे. पाटील यांच्या 52 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधी नितीन व्हटकर यांनी त्यांची मुलाखत घेतली यावेळी त्यांनी मुक्तपणे सर्व प्रश्नांची उतरे दिली .

प्रश्न- आज आपल्या आमदारपदाच्या कारकिर्दीस जवळपास साडेतीन वर्षे पुर्ण झाली आहेत.जनतेने दिलेेल्या या संधीबद्दल आज आपलं काय मत आहे ?

उत्तर- खर तर करमाळा मतदार संघातील जनतेने मला संधी देऊन हे पद दिलं आहे अस म्हणण्यापेक्षा जनतेने माझ्यावर एक जबाबदारी टाकली असं मी म्हणेल.जनतेने जो विश्वास टाकलाय तो सार्थ करण्यासाठी मात्र हि संधी आहे असं मला वाटतं.यामुळे मग निवडणुक काळात जनतेला जाहिरनाम्याच्या माध्यमातून दिलेले शब्द कामाच्या रूपातुन पुर्ण करण्यासाठी मी साडे तीन वर्षाच्या या कालावधीत तन मन व धन अर्पुण प्रयत्न करीत आहे.मला वाटत अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लागलीत.मतदार संघात नव्याने अनेक कामे मंजुर झालीत यातच खर तर माझी कार्यक्षमता मी सिध्द करत आहे असे मला वाटते.जनतेने दिलेल्या या संधीचे सोने करण्यासाठीच आपण या पदाचा वापर करत असुन मतदार संघाचा सर्वांगिण विकास हेच आपलं सुत्र आणि हवं तर ध्येय आहे असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही.

प्रश्न- मतदार संघातील अनेक विकासकामांना शासनदरबारी मांडताना आपणास आलेल्या अडचणी व अनुभवाबद्दल आपण काय सांगाल ?

उत्तर- जीवनातील अनेक वर्षाचा काळ हा लाल मातीची शान वाढवण्यासाठी घालवला.यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले.आमदार झाल्यानंतर मंत्रालयीन पातळीवर आयएएस वर्गातील अधिकारी आणि सचिव मंडळीसमोर मला मतदार संघातील प्रश्न मांडायचे होते.मंत्रीमहोदयांकडून मान्यता मिळणार याची खात्री असायची पण.खरी कसोटी हि आपल्या कामाची फाईल गतिमानतेने अंतरिम प्रशासकीय मान्यतेपर्यंत गेली पाहिजे यासाठी होती.पण सुदैवाने मी अगदी सरपंच पदापासुन ते पं.स.सभापती पदापर्यंत विविध विभागाचा अनुभव घेतला होता.शासकीय अधिकारी व यंत्रणा कशी हाताळावी याचा अनुभव होता.आणि शेवटी आमदार हे पद जवळ असुनही मी प्रत्येक विभागात जाऊन सचिवांशी चर्चा करत असे.यामुळेच मग कामे वेगात होत गेली.कामाची हि पध्दत विधानसभेतील अनेक जेष्ठ नेतेमंडळी अवलंबित होती.जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख असतील अथवा आमदार बबनदादा शिंदे असतील त्यांच्या पासुन काहीतरी शिकायला मिळाले.मग मतदार संघातील अनेक प्रश्न सभागृहात लेखि व आवाजी स्वरूपात मांडताना माझा आत्मविश्वास वाढतच होता.

प्रश्न- आता पर्यंत आपण केलेल्या विकास कामापैकी आपणास सर्वाधिक समाधान दिलेले काम कोणते ?

उत्तर- खर तर आमदार झाल्यानंतर हातुन झालेल्या प्रत्येक कामाचे अंतरिक समाधान मला मिळाले.पण सहाजिकच जवळपास दोन दशकाहून अधिककाळ रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना जेंव्हा मार्गी लागली.या योजनेच्या दोन्ही टप्प्याची चाचणी यशस्वी करू शकलो यात खरे समाधान वाटले.कारण माझे वडील कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी मला आमदारपदावर संधी मिळाल्यानंतर सांगितलेले हे पहिले काम होते.या कामावर तालूक्याच्या पुर्व भागातील लाखो शेतकरी कुटुंबाचे भविष्य आधारित होते.पण आपण पाठपुरावा केला.निधी मिळवण्यात यश आले.ग्राऊंड लेवलवर काम पुर्ण करण्यात अडचणी नाहीत आल्या.यामुळेच मग जवळपास पंचवीस हजार एकर जमीन ओलिताखाली आणणारा हा प्रकल्प आपण कार्यान्वित करू शकलो.हा प्रकल्प जर मी पुर्णत्वास नसता नेला तर माझ्याही कार्यक्षमतेवर अकार्यक्षमतेचा शिक्का बसला असता हि एक भीती मनात होती.शेतकरी कुटूंबाची वेदना मला स्वस्थ बसू देत नव्हती.मग यातुन कार्यपुर्ती झाली.आज आपण या कामाबद्दल समाधानी आहोत.परंतु एवढ्यावरच न थांबता हा प्रकल्प सौर उर्जेवर चालवला जावा यासाठी आपले प्रयत्न आहेत.

प्रश्न-आपले हातुन रस्त्यांची कामे फार मोठ्या प्रमाणावर मार्गी लागली याबद्दल काय वाटतं…

उत्तर- खर तर मतदार संघात खराब व नादुरूस्त रस्त्यांचे प्रमाण खुप होते.अनेक गावे याचे परिणाम भोगत होती.पण आपण विशेष लक्ष देऊन अर्थसंकल्पात हे रस्ते समाविष्ट केले.निधीसाठी पाठपुरावा केला.केवळ राज्यच नाही तर केंद्र सरकार कडूनही निधी मिळवण्यात यश आले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अथवा अन्य हेड अंतर्गत काही रस्ते मंजुर करून घेतले.यामुळे अनेक रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले.कोर्टी ते जिंती हा अनेक वर्ष रखडलेला रस्ता असुद्या अथवा केतुर पोमलवाडी रस्ता,डिकसळ पुल,केम भाळवणी रस्ता,घोटी परिसरातील रस्ते यासह मतदार संघातील अनेक रस्ते मार्गी लागले आहेत.

प्रश्न- आमदार पदाच्या कालावधीत आपल्या वाढलेल्या जनाधाराबद्दल काय मत आहे ?

उत्तर- सहाजिकच आपण केलेल्या कामाची हि पोचपावती आहे असे वाटते.पंचवीस वर्षे एका ठराविक गटाच्या ताब्यात असलली करमाळा पंचायत समितीची सत्ता शिवसेनेच्या हाती सोपवताना जनतेने मी केलेल्या विकासकामांची गोळाबेरीज नक्की केली असेल असे वाटते.याशिवाय अनेक गावामध्ये सत्तांतरे झाली आहेत.जनाधार वाढत आहे आणि जनतेने विकासालाच प्राधान्य देण्याची विधानसभा निवडणुकीतील आपली भुमिका पुढेही कायम.ठेवली याचा आनंद वाटत आहे.

प्रश्न- सध्या आपणासमोर असलेल्या राजकीय आवाहनाबद्दल काय वाटतं…?

उत्तर- खरं तर मला राजकीय आवाहनाला सामोरे जाण्याची वेळ जेंव्हा जेंव्हा येते तेंव्हा जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी असते.यामुळे मग हि लढाई माझ्या एकट्याची होत नाही.जनशक्तीचे प्रतिनिधीत्व मी करत आहे म्हणुन धनशक्तीचा पराजय करण्यात मला इथुन पुढेही कधी अडचण.येईल असे वाटत नाही.