सिद्धार्थ आणि मितालीच्या घरी खास पाहुण्याचे आगमन

sidarth chandekar

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप आहे. नुकतेच त्याने  मिताली मयेकर सोबत लग्नगाठ बांधली. मात्र सध्या यांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. सिद्धार्थच्या मुंबईच्या गोरगावमधील घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. याबाबत सिद्धार्थने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

मात्र हि पाहुणे मंडळी म्हणजे माकड आहे. यावेळी त्यांच्या घरातील खिडकीवर माकड आले आणि यावेळी तिने त्यांचा मस्त पाहुणचार देखील केला. मितालीच्या या व्हिडिओची तर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे त्याच्याप्रमाणे या व्हिडिओच्या कॅप्शनची देखील चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मिताली तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अधूनमधून प्राण्यांचे फोटो शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी देखील मितालीनं त्यांच्या घरामागील जागेत बिबट्याचा वावर असलेला व्हिडिओ शेअर केला होता.

दरम्यान,सिद्धार्थला या प्राण्याचं दर्शन होण्यामागचं कारण म्हणजे दोघेही संजय गांधी नॅशनल पार्कजवळ राहतात. याआधी देखील त्याने बिबट्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. एवढंच नाही तर सिद्धार्थने त्या बिबट्याचा फोटोही क्लिक केला होता. असे अनेक प्राणी त्याच्या घराजवळ पाहायला मिळतात.

 

महत्त्वाच्या बातम्या