शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मदतीसाठी विशेष निधी

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ८० वा वाढदिवस साजरा करत आहेत.यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या ऑफिशियल ट्वीटर शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशी घटना घडली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातूनच नव्हे तर देशभरातून त्यांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ८० लाख रुपयांचा विशेष निधी जमा करून तो धनादेश आज शरद पवारांना सोपविण्यात आला. या निधीचा वापर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वापरावा अशी सूचना शरद पवारांनी नेत्यांना केली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ८० लाखांचा धनादेश दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पैसे जमा केले. राष्ट्रवादी पक्षाचा वेलफेअर ट्रस्ट आहे. ज्या कुटुंबाच्या प्रमुखाने शेतीच्या समस्येमुळे आत्महत्या केली. त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरावी, ही रक्कम फिक्स डिपोझिट ठेऊ, १ लाखांपैकी ५० हजार रक्कम बॅंकेत ठेवायची आणि त्या व्याजातून शिक्षण द्यायचं. उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या :