राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

ELECTION COMMISSION

मुंबई – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येईल.

मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध -शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८;
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी -शनिवार, दि.१ सप्टेंबर ते बुधवार, दि.३१ ऑक्टोबर २०१८;
दावे व हरकती निकालात काढणे – शुक्रवार, दि. ३० नाव्हेंबर २०१८ पूर्वी;
डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई -गुरुवार, दि.३ जानेवारी २०१९ पूर्वी;
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध -शुक्रवार, दि. ४ जानेवारी २०१९

दि.१ जानेवारी २०१९ रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि.१ जानेवारी २००१ वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवाशी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.

दि.१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती/सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज दि.१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) (ERO) यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

लोकप्रतिनिधत्व अधिनियम, १९५० अन्यये विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करुन पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

याद्वारे सर्व राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक मतदार केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (Booth Level Agent) (BLA) नेमणूक करावी शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) (BLO) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.

मतदारांच्या सुलभतेसाठीwww.nvsp.in या संकेतस्थावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. उपरोक्त सर्व माहिती दि.१ सप्टेंबर २०१८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील, अशी माहिती अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.