मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन, आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार ?

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनावेळी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यावरील केसेस मागे घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, तसेच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यभरात आठवड्याभरापासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तसेच लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशी आग्रही मागणी होते आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर साधक-बाधक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असले तरी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यातील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असा निर्णय झाल्याचं कळतंय.

ते रेकॉर्डिंग जाहीर करा, आगीत तेल ओतू नका ; पवारांनी चंद्रकांत पाटलांना झापले

महाराष्ट्रातील या साखर कारखान्याला मिळणार ‘नवसंजीवनी’