सुषमाजी, असं अचानक जायला नको होतं हो…

पार्थ कपोले : रात्री साडेनऊ वाजता ऑफिसहून घरी आलो. आणि साडेदहाच्या सुमारास सुषमा स्वराज यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी आली. अर्थात, अधिकृत काहीही समजले नसल्याने ही अफवाच ठरावी, असं मनोमन वाटलं. पण काही मिनिटातचं बातमी खरी ठरली. देशाच्या परराष्ट्र मंत्री, विरोधी पक्षनेत्या, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, भाजप प्रवक्त्याच्या रुपात राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या, फायरब्रँड वक्त्या, प्रखर राष्ट्रवादी अशा अनेक रुपात सुषमा स्वराज यांनी ओळख.

संसदेत त्या बोलायला उभ्या राहिल्या की विद्युल्लता कडाडणे म्हणजे काय, याचाच प्रत्यय यायचा. अभ्यासपूर्ण आणि ठाम मांडणी, कमालीचा आत्मविश्वास आणि अमोघ वक्तृत्व यामुळे त्यांचं बोलणं वेगळ्याच उंचीवर जायचं. आणि ते ऐकताना त्यांच्याबद्दलचा आदर दरवेळी वाढायचा. लहानपणी सुषमा स्वराज यांना टिव्हीवरचं बघायचो, तेव्हा त्यांच्या राजकीय भाषणातलं काही कळत नसलं तरी त्यांना पाहून फार बरं वाटायचं. कपाळावर ठसठशीत असलेलं कुंकू आणि साडीवर स्वेटर घातलेली त्यांची मुद्रा त्या आपल्याच कोणीतरी, अगदी घरच्याच आहेत, असं वाटायचं.

नोकरीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत आल्यावर आणि सुदैवाने पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने २७ जुलै, २०१८ या दिवशी महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या एका सेमिनारमध्ये सुषमा स्वराज अध्यक्षस्थानी होत्या. तेव्हा त्यांना अगदी जवळून बघण्याची आणि अगदी दोनच शब्द बोलायची लहानपणापासूनची इच्छा पूर्ण झाली होती.

त्या सेमिनारचा विषय एनआरआय विवाह, त्यात होणारी फसवणूक आणि महिलांची तस्करी असा होता. फसवणूक झालेल्या महिलांना मदतीचे ठोस आश्वासन देताना स्वराज यांच्यातल्या कर्तव्यकठोर परराष्ट्र मंत्री आणि त्याचवेळी मुलींनो आणि त्यांच्या आई – वडिलांनो, फक्त परदेशी जायला मिळेल याला भाळून कोणाशीही लग्न करू नका अशी भावनिक साद घालणारी आई ही दिसली होती.

प्रसुतीकळा सोसणाऱ्या महिलेचा सहा किलोमीटर खाटेवर प्रवास..

चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्यात महिलांबरोबर झाली छेडछाड