त्यांचे केवळ तोंडच चालते – सुप्रिया सुळे

supriya sule

अमळनेर: हल्लाबोल आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. मोदी सरकारकडे भाषण करण्याचे कौशल्य असल्याने ते खोटेही खरे करतात. असे त्या म्हणाल्या. तसेच भाजप सत्तेत आले तेव्हापासून महागाई वाढत आहे. हल्लाबोल यात्रेत झालेल्या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”बहुत हो गयी महंगाई की मार… अब की बार मोदी सरकार… अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे, त्यांना भाषण करण्याचे कौशल्य असल्याने ते खोटेही खरे असल्यासारखे सांगतात. ही शोकांतिका आहे,”

त्या पुढे म्हणाल्या नरेंद्र मोदी हे भाषणाच्या वेळी मोठमोठी स्वप्नं दाखवतात. मात्र ते पूर्ण करत नाहीत. भाषण करण्याचे कौशल्य असल्याने खोटेही ते खरे करून सांगतात. त्यांचे केवळ तोंडच चालते. मात्र, कान चालत नाहीत. मुंबई येथे शिवाजी महाराज स्मारकाच्या कार्यक्रमासाठी पाच कोटी व जाहिरातींवर चौदा कोटी असे 19 कोटींचा खर्च करण्यात आला. हा खर्च जर पाडळसे धरणासाठी दिला असता तर बरे झाले असते. स्वच्छता अभियानाचे खरे प्रवर्तक माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटीलच आहेत. त्यांची पोकळी आजही पक्षाला जाणवत आहे.” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.