fbpx

वीरपत्नी नीरजा देवी यांची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट; मोबाईलवर बोलत होतो,पलिकडून भीषण स्फोटाचा…

टीम महाराष्ट्र देशा – गुरुवारी शहीद जवान प्रदीप सिंह यादव हे त्यांच्या पत्नीसोबत मोबाईलवर बोलत होते, त्यावेळी अचानक त्यांच्या पत्नीला पलीकडून कानठळ्या बसवणार एक मोठा आवाज ऐकू आला. तिथेच त्या दोघांचे संभाषण तुटलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेमुळे वीरपत्नी नीरजा देवी यांना मोठा धक्का बसला आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांविषयी हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत.
शहीद जवान प्रदिप सिंह यादव यांच्या पत्नी नीरजा देवी यांनी सांगितले की,

‘सीआरपीएफ’ जवानांच्या वाहनांचा ताफा जात असताना शहीद जवान प्रदीप सिंह आणि त्यांचे सहकारी ज्या बसमधून प्रवास करत होते. त्याच बसवर स्फोटकं भरलेली कार आदळली. त्यावेळी प्रदीप सिंह हे त्यांच्या पत्नी निरजा देवींसोबत फोनवर बोलत होते. ‘आम्ही बोलत असतानाच पलिकडून भीषण स्फोटाचा आवाज येताच फोन कट झाला, मी पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हाच मनात एक विचित्र भीतीची दाटली. त्याचवेळी सर्वकाही संपलं होतं. आमचे शेवटचे बोलणंही अपूर्णच राहिले.’