‘पवार साहेबांबद्दल बोलून दानवेंनी स्वतःला बारा…पाना का म्हटलं होतं हे सिद्ध केलंय’

amol mitkari

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसची स्थितीबद्दल मोठे भाष्य केलं. काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपआपल्या तयारी सुरु केली आहे. यावरुन आघाडीमध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, पवारांचे विधान काँग्रेसला बोचल्याचे दिसून आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील त्यावर भाष्य केलं.

‘काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते. म्हणूनच पवारांनी त्या माडीला टेकू दिला आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून दानवेंनी खोचक टोला लगावला आहे. ‘पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये परतावे की परतू नये, याबद्दल रावसाहेब दानवेंनी मतप्रदर्शन करून बारा…पाना हे स्वतःला त्यांनी का म्हंटल होतं हे सिद्ध केलंय.’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या