तुम्ही तोंडी बोलाल, पण विश्वास कसा ठेवू? – जयंत पाटलांचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंचनाची आकडेवारी जाहीर करण्याचं धाडस सरकारमध्ये नाही, असं विधान जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं.

या विषयी बोलताना जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील जलसिंचनाच्या कामात सरकार फारशी प्रगती करू शकलेले नाही, हे सत्य आहे. त्यामुळेच आर्थिक वार्षिक पाहणी अहवालात सिंचनाची आकडेवारी दाखवण्याचे धाडस या सरकारचे जलसंपदा व ग्रामविकास विभाग दाखवू शकले नाही, असा आरोप केला. तसेच “जलसंपदा विभाग आणि ग्रामविकास विभागाने गेल्या पाच वर्षात किती टक्के सिंचन झालेले आहे, हे सांगायचं धाडस सरकारमध्ये नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हांला वार्षिक आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्यात किती टक्के सिंचन झाले आहे, हे सांगता आले नाही, तसे ते छापता आले नाही. असेही पुढे बोलताना पाटील म्हणाले.

दरम्यान, आता तोंडी तुम्ही बोलाल, त्यावर कसा विश्वास ठेवायचा? कारण प्रत्यक्ष पाहणीतच आकडेवारी आली नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे सिंचन किती झालं हे सांगता आलं नाही. जर पाच वर्षापूर्वीची आणि आताची आकडेवारी बघितली तर असे दिसतं की तुम्ही फारशी प्रगती करू शकला नाहीत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं.