fbpx

राज ठाकरे प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, त्यांच्यामुळे कॉंग्रेस आघाडीला नुकसानचं – आझमी

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे परप्रांतीयांवर हल्ले झाले असून त्यांना मारहाण करण्यात आली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे निवडणुकीत विसरले आहेत. राज यांना सोबत घेतल्याने कॉंग्रेस आघाडीला फायदा नसून नुकसानचं होणार, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष संपला असून ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, ज्या प्रकारे लोक असरानी , मेहमूद सारख्या कलाकारांना ऐकायचे तसचं राज ठाकरे हे मिमिक्री आर्टीस्ट आहेत, त्यामुळे लोक त्यांनाही ऐकतात, असा घणाघात आझमी यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 50 टक्के नुकसान होईल, अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली आहे.

अखेरच्या टप्यातील मतदान आज

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांतील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत असलेल्या वाराणसी लोकसभेचा देखील समावेश आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. १० कोटींहून अधिक मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. तर २३ मे रोजी दिल्लीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.