‘भाजप आणि सीबीआय च साटलोट’

modi

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रीय अन्वेषण विभागाची उत्तर प्रदेशातील अवैध खनन घोटाळ्याप्रकरणी केली गेलेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा आरोप पुढे ठेवत समाजवादी पार्टीच्या खासदारांनी सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे संसदीय कामकाज देखील तहकूब करण्यात आले.

समाजवादी पार्टीच्या खासदारांच्या मते , केंद्रीय अन्वेषण विभाग आणि भाजप सरकार यांचे साटलोट असल्याने सरकार सूड बुद्धीने विरोधकांवर कारवाया करत आहे. असा आरोप समाजवादी पार्टीच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केला. तर संसदेच्या प्रांगणात देखील मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली.

सीबीआयने अवैध खननप्रकरणी छापेमारी केल्यामुळे यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अडचणीत आले आहेत.