भाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी

टीम महाराष्ट्र देशा : सत्ताधारी भाजपविरोधात सर्व विरोधीपक्षांच्या महाआघाडीची मोट बांधण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कधीकाळी कट्टर विरोधक असणारे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी एकत्र येत नव्या आघाडीच्या स्थापनेची घोषणा आज केली आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये कॉंग्रेस महाआघाडीला सुरुंग लागला आहे.

Loading...

सपा आणि बसप एकत्र आल्याने उत्तर प्रदेशमधील राजकारणाला नवीन वळण लागणार आहे. शनिवारी लखनौत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. दरम्यान, ही आघाडी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ठरेल असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसने देशात घोषित आणीबाणी लादली होती तर सध्या भाजपच्या सत्ताकाळात अघोषित आणीबाणी आहे. आजवर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती, मात्र काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार गरिबी वाढली होती. त्यामुळे काँग्रेस- भाजपची अवस्था एकसारखीच असल्याची टीका यावेळी दोन्ही नेत्यांनी केली आहे. भाजप सरकारच्या काळामध्ये देशात शेतकरी, व्यापारी, तसेच समाजातील सर्व घटक दुखावले गेल्याचा आरोप मायावती यांनी यावेळी केला.

दरम्यान, समाजवादी पक्ष आणि बसपामध्ये जागा वाटपाचा फॉरम्युला देखील ठरला आहे. यामध्ये राज्यातील ८० जागापैकी ३८ जागा सपा तर ३८ जागा बसपा लढणार आहे. कॉंग्रेस घराण्याचे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवारी दिले जाणार नाहीत. तर उरलेल्या जागा या इतर छोट्या पक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती मायावती यांनी दिली आहे.Loading…


Loading…

Loading...