परतीचा पाऊस समाधानकारक; रब्बीच्या पेरणीला सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा- परभणी जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असून, शेतकरी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे. परतीचा पाऊस समाधानकारक झाला आणि जमिनीत ओलावा आहे हे पाहून शेतकरी पेरण्या करतांना दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या हंगामातली सोयाबीन, कपाशी ही पीकं वाचल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून परतला आहे, हवामान विभागानं काल ही माहिती दिली. ईशान्य भारतातून सुरु झालेला पावसाचा परतीचा प्रवास काल आठ दिवसानंतर पूर्ण झाला, नैऋत्य मोसमी पावसाची ही आजवरची सर्वात जलद माघार असावी असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात अठरा ऑक्टोबरनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीकं सुरक्षित ठेवावीत, दुपारनंतर येणारे वादळी वारे आणि वीजांपासून स्वत:चं संरक्षण करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या