यंदा मान्सून चार दिवस आधीच केरळमध्ये धडकणार

नवी दिल्ली- यंदा मान्सून चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. सामांन्यपणे मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो मात्र यावर्षी तो 28 मे रोजीच दाखल होणार असून, देशात १०० टक्के पाऊस होणार असल्याचं स्कायमेटनं म्हंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे.भारतीय हवामान विभागानं पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

You might also like
Comments
Loading...