South India Tour | ‘ही’ आहेत दक्षिण भारतातील छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं

South India Tour : दक्षिण भारतामध्ये आपल्याला परंपरा, संस्कृती आणि निसर्गसौंदर्य बघायला मिळते. निसर्गाच्या कुशीत वसलेले अनेक सुंदर ठिकाणं दक्षिण भारतामध्ये आहे. दक्षिण भारतामध्ये अनेक छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं आहेत. या ठिकाणी तुम्हाला चहाचे मळे, हिल स्टेशन, शांत समुद्रकिनारे, बॅकवॉटर इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी तुम्ही दक्षिण भारतातील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

गोकर्ण ( Gokarna South India Tour )

दक्षिण भारतातील गोकर्ण हे एक छोटे पण अतिशय सुंदर शहर आहे. हे ठिकाण समुद्रकिनारे आणि नयनरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. समुद्रप्रेमी या ठिकाणाला प्रथम प्राधान्य देतात. या ठिकाणी तुम्ही सुंदर समुद्रकिनाऱ्यासोबतच महाबळेश्वर मंदिराला भेट देऊ शकतात. गोकर्णमध्ये तुम्हाला उत्कृष्ट बोट राईटचा अनुभव घेता येऊ शकतो.

अराकू व्हॅली ( Araku Valley Tourism | South India Tour )

अराकू व्हॅली हे ठिकाण आंध्र प्रदेशच्या पूर्व घाटात वसलेले आहे. हे एक हिल स्टेशन आहे. अराकू व्हॅली या ठिकाणी तुम्ही कॉफी फार्मचा आनंद घेऊ शकतात. आंध्र प्रदेशच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि तेथील जनजीवन जवळून बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकतात.

वट्टकनल ( South India Tour )

तमिळनाडूमधील कोडाईकोनालजवळ वसलेले वट्टकनल हे एक छोटेसे गाव आहे. हे ठिकाण निसर्गसौंदर्याने वेढलेले आहे. शहराच्या गोंगटातून शांतता शोधत असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकते. वट्टकनलमध्ये तुम्ही ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकतात. या ठिकाणचे स्थानिक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

कोल्लम ( Kollam South India Tour )

केरळ राज्यामध्ये अष्टमुडी तलावाच्या काठावर कोल्लम हे ठिकाण वसलेले आहे. कोल्लममधील बॅकवॉटर आणि पारंपारिक हाऊसबोट पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. केरळमधील स्थानिक संस्कृती आणि सौंदर्य जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button