पाकिस्तानविरुद्धची मालिका सुरु असताना दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू IPLसाठी भारतात ; आफ्रिदीची टीका

आफ्रिदी

इस्लामाबाद : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहे.

क्रिकेट विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आयपीएलसाठी  दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी चक्क पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, खगिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया व लुंगी एन्गिडी हे दक्षिण आफ्रिकन खेळाडू पाकिस्तान दौरा सोडून आयपीएलसाठी भारतात दाखल झाले.

यावरच पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आयपीएलवर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  यांच्यात झालेली वन-डे मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. त्यानंतर आफ्रिदीनं ट्विट करत नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तान विरुद्धची वन-डे मालिका सुरु असतानाच दक्षिण आफ्रिकेचे बडे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या मुद्यावर आफ्रिदीनं नाराजी व्यक्त केली आहे. ‘दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डानं त्यांना मालिका सुरु असतानाच IPL खेळण्यासाठी जाण्याची परवानगी दिली, हे आश्चर्यकारक आहे. T20 लीग इंटरनॅशनल क्रिकेटवर वरचढ ठरताना पाहून वाईट वाटते. या विषयावर विचार करण्याची गरज आहे.’ असं मत आफ्रदीनं व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या