दक्षिण अफ्रीकेतील मालिका पराभवानंतरी भारत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल

टीम महाराष्ट्र देशा: विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वांडरर्स येथिल तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रीकेवर अविश्वसनीय विजय मिळवत आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण अफ्रीकेने भारताचा २-१ असा पराभव करूनही त्यांना दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागेल.

आयसीसीच्या ताज्या अहवालानुसार भारतीय संघाने क्रमवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. यासाठी क्रमवारीतील अव्वल स्थानाबरोबरच भारतीय संघाला एक लाख अमेरिकन डॉलर चे बक्षीस मिळणार आहे. २०१६ पासून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाचा २-१ असा केलेला पराभव त्यांना अव्वल स्थानी विराजमान होण्यासाठी पुरेसा ठरला नाही.

दक्षिण अफ्रीका दौर्यापूर्वी १२४ गुणांसह भारत दक्षिण अफ्रीकेपेक्षा १३ गुणांनी पुढे होता. या मालिक पराभवानंतर भारताची फक्त ३ गुणांनी घसरण होऊन १२१ गुणांवर भारतीय संघ आला आहे.तर या मालिक विजयातून दक्षिण अफ्रीकेला फक्त ३ गुणांची कमाई करता आली.

दक्षिण अफ्रीकेला त्यांचे क्रमवारीतील द्वितीय स्थान कायम राखन्यासाठी मार्च मधे होणाऱ्या आँस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत कमीत कमी एक सामना जिंकने गरजेेचे आहे. जर या मालिकेत आँस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रीकेवर ३-० किंवा ४-० आशा फरकाने मालिक जिंकली तर ते तिसऱ्या स्थानावरून  दुसऱ्या स्थानावर झेप घेतील.