आर्यलँडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३३ धावांनी विजय

मुंबई : एकदिवसीय मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी-२० मालिकेत ३३ धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यलँडला १३२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह दक्षिण अफ्रिकेने टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकत आर्यंलँडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ७ गडी गमावत १६५ धावांची मजल मारली. ऐडेन मार्क्रामने दक्षिण अफ्रिकेकडून ३० चेंडुत २ चौकार आणि २ षटकारासंह ३९ धावांची मजल मारली. आर्यलँडकडून मार्क अदायरने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात आर्यलँडचा संघाने ९ गडी गमावत १३२ धावांची मजल मारली. यासह दक्षिण अफ्रिकेने पहिला टी-२० सामना ३३ धावांनी जिंकला. हॅरी टेक्टरने आर्यलँडकडून ३४ चेंडुत ३ चौकारासह सर्वाधीक ३६ धावांची खेळी केली. तबरायझ शमसीने दक्षिण अफ्रिकेकडून सर्वाधिक ४ गडी बाद केले. त्यालाच सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP