दक्षिण आफ्रिकेचा संघ हा धोकादायक – विराट कोहली

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांने दक्षिण आफ्रिकेचा संघ हा धोकादायक असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीचा आफ्रिकेचा संघ समतोल आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना कमवूत समजून चालणार नाही, असे विराटने म्हटले आहे. सलामीच्या सामन्यात आमच्यातील क्षमतेवर लक्षकेंद्रीत करुन चांगली कामगिरी करु, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करत आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना हा साउथहॅम्टनच्या मैदानात रंगणार आहे. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचे रेकॉर्ड खराब असले तरी सध्याच्या घडीला आफ्रिकन संघ संघर्ष करत आहे. त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीलाच दोन सामने गमावले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात