मुंबई : बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर (social media) दररोज त्यांचे फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांच्या नव्या पोस्टची नेटकरी देखील आतुरतेने वाट पाहतात. नुकतच त्यांनी त्यांच्या नवीन फोटोचा कोलाज शेअर केला आहे, यांच्या पोस्टवर चक्क क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) देखील अशी कमेंट केली आहे की, नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहेत.
दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून नवीन फोटोचा कोलाज शेअर केला आहे. बिग बींंनी घातलेल्या नेव्ही ब्लू कलरच्या हुडी ट्रॅकसूट, निळ्या टोपीने घालून बाहेर येताना दिसत आहेत. पायात बूट घालून एक हात बाहेर तर एक हात खिशात अशी हटके स्टाइल पाहायला मिळत आहे. अमिताभ यांच्या हुडीवर ‘सिटी फॉग’ (‘City Fog’) लिहिले आहे. स्वत:चा हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हो… तुम्ही बरोबर आहात… शहरात धुके नाही.. मुंबई (Mumbai) उजळली आहे.. कोविडला शून्य करून आपण सर्वांनी उजळले पाहिजे.. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी स्वतःचा असाच एक फोटो शेअर करून ते कामावर परतले असल्याचे सांगितले होते. अमिताभ कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना दिसले.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट बघून क्रिकेटर सौरव गांगुलीही आश्चर्यचकित झाला. ‘Boss is Out… त्यांच्यासाठी वय फक्त एक संख्या आहे’. अशी कमेंट केली असून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच लाखो चाहते कमेंट करत त्यांचे जोरदार कौतुक करत आहेत. अमिताभ बच्चन सतत व्यस्त असून बिग बी ‘रनवे 34’, ‘उच्छाई’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी सांगितले होते की, ते रोज झोपण्यापूर्वी लिहितात.
महत्वाच्या बातम्या:
बदनापूर नगरपंचायतीत भाजपने ‘असा’ दिला महाविकास आघाडीला शह; नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक