भारतीय क्रिकेटचा दादा…

टीम महाराष्ट्र देशा: जगातल्या आक्रमक कर्णधारपैकी गांगुली हा एक होता. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याचा विश्वास निर्माण केला तो याच अवलीयाने. २००२ सालची इंग्लंड विरुध्द नटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर गांगुलीने ज्या पद्धतीने शर्ट काडून विजय साजरा केला होता तो क्षण आजही करोडो चाहत्यांच्या स्मरणात आहेे. गांगुलीला निवृत्त होऊन आता ९ वर्ष उलटत आलीत पण आजही गांगुली भारतीय क्रिकेटशी ह्या ना त्या कारणाने जोडलेला आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा गांगुली हा आठवा भारतीय खेळाडू आहे. गांगुली भारताकडून ३०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे .भारताच्या क्रिकेट इतिहासात एकदिवसीय सामन्यात सचिननंतर सर्वाधिक धावा गांगुलीच्या नावावर आहेत. त्याने ११३ कसोटी सामन्यात १५शतके आणि ३११ एकदिवसीय सामन्यांतली २२ शतके ठोकली आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,००० धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.

The Prince Of Calcuttaगांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे कर्णधारपदी होता. ४९ सामन्यामधून २१ सामन्यांत भारताला गांगुलीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत विजय मिळवुन दिलेत. २००३ च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा धुरा हा गांगुलीच्या हाथी होता. या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती.