परभणीत लवकरच अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल- पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने  

परभणीत लवकरच अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल- पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने  

Dr. Rahul Patil

परभणी :  येथे अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केली आहे. परभणीमध्ये आयोजित मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

माझी रुग्णसेवेच्या कारकिर्दीची सुरुवात परभणी पासून झाली, परभणीने मला लहानेचे मोठे पण मिळवून दिले. त्यामुळे ज्या ज्या वेळी मला बोलावले जाईल, त्या वेळी मी नक्की येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परभणीतील व्यक्ती, डॉक्टर संजय टाकळकर, संदीप पेडगावकर, रणजीत कारेगावकर, डॉक्टर राजगोपाल कालानी, शंकर आजेगावकर, सुभाषचंद्र सारडा, डॉक्टर सालेहा कौसर, डॉक्टर दिनेश भुतडा, प्रदीप गोलेच्छा, दिलीप जोगड, झुंबरलाल मुथा, सुनील मुथा, डॉक्टर संदीप मोरे यांना २०२१ चा ‘प्रभावती नगरी सेवा गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या