Sony- सोनीचा वायरलेस स्पोर्टस वॉकमन

सोनी कंपनीने ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीस असणारा एनडब्ल्यू-डब्ल्यूएस६२३ हा वॉकमन ८,९९० रूपये मुल्यात भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

स्मार्टफोनच्या युगात एक काळ गाजवणारा वॉकमन बराचसा मागे पडला आहे. मात्र सोनी कंपनी जाणीवपूर्वक यात वैविध्यपूर्ण फिचर्सचा समावेश करून विविध मॉडेल्स लाँच करत आहेत. यात एनडब्ल्यू-डब्ल्यूएस६२३ या मॉडेलची भर पडली आहे.

 

यात ब्ल्यु-टुथसह एनएफसी फिचरही देण्यात आले आहे. या दोन्ही पर्यायांच्या माध्यमातून युजर आपला स्मार्टफोन या वॉकमनला कनेक्ट करू शकतो. याचे वजन अवघे ३२ ग्रॅम असल्याने तो वापरण्यासाठी अतिशय सुलभ असा आहे. यातील बॅटरी दीड तासात चार्ज होत असून ती तब्बल १२ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

फक्त तीन मिनिटांच्या चार्जींगमध्ये हा वॉकमन एक तासापर्यंत चालू शकत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यात चार जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे मॉडेल वॉटरप्रुफ व डस्टप्रुफ असल्याने याचा कोणत्याही वातावरणात वापर करता येतो. हे मॉडेल सोनी कंपनीच्या देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.