Sony- सोनी चा नवीन “ए १ ओएलईडी” टिव्ही

सोनी कंपनीने ए १ ब्राव्हिया ही ओएलईडी फोर-के टिव्ही भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सोनी ए १ ब्राव्हिया हे टिव्ही ५५ (केडी५५ए१) आणि ६५ इंच (केडी६५ए१) हे दोन टीव्ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले असून त्याची किंमत ३,६४,९०० आणि ४,६४,९०० रूपये इतकी आहे. सोनी कंपनीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान नोंदणी करणार्‍या ग्राहकांना आपल्या या दोन्ही मॉडेल्ससोबत प्लेस्टेशन ४ हा गेमिंग कन्सोल मोफत देण्याची घोषणा केली आहे.

सोनी कंपनीचे हे दोन्ही टिव्ही अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत, यावर कंपनीचा युजर इंटरफेस असेल. यात गुगल प्ले स्टोअरवरून विविध अ‍ॅप्स डाऊनलोड करून वापरता येतील. व्हाईस सर्चच्या मदतीने यात हवे ते कंटेंट सर्च करण्याची सुविधा असेल. यासोबत ४२ भारतीय भाषांचा सपोर्ट असणारा रिमोट प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये गुगलचे क्रोमकास्ट हे इनबिल्ट पध्दतीत देण्यात आल्याने युजर आपला स्मार्टफोन या टिव्हीला कनेक्ट करू शकतो.  यात वाय-फाय, चार एचडीएमआय पोर्ट, तीन युएसबी पोर्ट, एक आरएफ कनेक्शन इनपुट, एक कंपोजिट व्हिडीओ इनपुट, इथरनेट पोर्ट, सब-वुफर पोर्ट, अ‍ॅनालॉग ऑडिओ आऊटपुट आणि हेडफोन जॅक या सुविधा आहेत.