‘सोनूने लोकांना घरी पोहचवले तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही’

Sonu Sood Vs Sanjay Raut

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

धक्कादायक : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

माणुसकी हरवली : गरोदर हत्तिणीनंतर आता गर्भवती गायीला खाऊ घातले फटाके

दरम्यान, संजय राऊत यांच्या या निष्कर्षावर भाजप नेते निलेश राणे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘अरे रे रे किती नीचपणा म्हणावा ह्या संज्याचा…. स्वतःला जमत नाही म्हणून वाट्टेल ते कोण स्वखर्चातून करतोय त्याच्यावर आरोप करायचे. संज्या तू तुझ एक कार्य सांग ह्या ३ महिन्यात स्वतःच्या पैश्याने केलेलं??? एकतर तू तुझे संध्याकाळचे टेबलावरचे विषय रोज सामन्यात छापून आणतो’. अस म्हणत राणेंनी संजय राऊत यांना फैलावर घेतल आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी देखील ट्विट करुन संजय राऊत यांना झापलं आहे. स्वत:ही करायचं नाही. सोनू सूदसारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत आहेत, त्यांचे कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नाहीत, म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत. प्रत्येक घरात उपासमार सुरु आहे. मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही, दुसरे करतात त्यांना तरी तरी करु द्या. शिवसेना नेते संजय राऊत यांचे विधान दुर्दैवी आहे. स्वत:चं सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलं आहे. हे खरं सोनू सूदवर आरोप केल्याने लपू शकणार नाही असा टोलाही राम कदम यांनी संजय राऊतांना लगावला आहे.