सोनू निगमच्या जीवाला धोका

वेब टीम – अजान मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे गायक सोनू निगम पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सोनूच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्तचर विभागाने पाठविलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.

Loading...

गेल्या वर्षी सोनू निगमने ट्विटरच्या माध्यमातून अजानविषयीचं ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळापासून ते अगदी कलाविश्वातही अनेकांनी मतप्रदर्शन करत या मुद्द्यावर आपल्या भूमिका मांडल्या होत्या. या साऱ्यामध्ये मुस्लिम धर्मियांनी सोनूला धारेवर धरत त्याला खडे बोलही सुनावले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

एखाद्या कार्यक्रमासाठी, कॉन्सर्टमध्ये , सार्वजनिक ठिकाणी गेला असता त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Loading…


Loading…

Loading...