मोदी सरकार हूकूमशाही पद्धतीनं सत्तेच्या अहंकारात मदमस्त- सोनिया गांधी

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चढवला हल्ला

नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. हूकूमशाही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाले असून मोदी सरकार सूड भावनेने काम करत असल्याची टीका मोदी सरकार करत आहे.

देशाला नवी दिशा देण्यासाठी सर्व प्रकरच्या बलिदानासाठी सज्ज व्हा, अशा शब्दात आज सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अध्यक्षपद स्वीकारल्यावर राहुल गांधींच्या नेतृत्वात आज दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये काँग्रेसचं ८४ वा राष्ट्रीय अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनात सकाळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

सोनिया गांधी म्हणाल्या, मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळे यावं लागलं. त्यानंतर, तुमच्या शक्तीच्या जोरावर आपण मोठं यश मिळवलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली असाध्य ते साध्य करून दाखवलं. कोट्यवधी जनतेच्या जीवनात बदल घडवणाऱ्या योजना आपण राबवल्या. पण आज या योजनांकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतंय, त्या कमकुवत करतंय. देशाची दिशा, धोरण काँग्रेसने ठरवणं गरजेचं आहे, देशवासीयांच्या आशा-आकांक्षा जाणून काँग्रेसनं देशाच्या राजकारणाचा सूत्रधार झालं पाहिजे. ४० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या दणदणीत विजयाने देशाच्या राजकारणाचं चित्र पालटून टाकलं होतं. काँग्रेस शक्तिशाली पक्ष ठरला होता. तशीच कामगिरी आपण येत्या काळात करू आणि राजकारणाला नवी दिशा मिळेल. जे लोक देशाच्या राजकारणातून काँग्रेसचं अस्तित्वच मिटवू इच्छित होते, त्यांना लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल किती प्रेम आहे, याची जाणीव नाही. गेल्या चार वर्षांत अहंकारी आणि सत्तांध सरकारने काँग्रेसला संपण्यासाठी खूप कारस्थानं केली. पण आम्हीच त्यांचा खोटेपणा आणि भ्रष्टाराच पुराव्यांसह जनतेपुढे उघड केला आहे.

You might also like
Comments
Loading...