सोनिया गांधींच वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’- नितीन गडकरी

नितीन गडकरी

नवी दिल्ली: सोनिया गांधी यांनी भाजपला २०१९ मध्ये सत्तेवरून खाली खेचून पुन्हा यूपीए सरकार सत्तेत येईल. असं म्हणाल्या होत्या. त्याबाबत नितीन गडकरी यांनी सोनिया गांधीची खिल्ली उडवली. ते ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’मध्ये बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “काँग्रेसला २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत येऊ असं वाटणं म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे. नुकतंच ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आम्ही जिंकत आहोत, केरळ आणि बंगालमध्येही चांगली कामगिरी करु. काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही, ते आम्ही ४ वर्षात करुन दाखवलं. सर्व अपेक्षा ५ वर्षात पूर्ण होणं शक्य नाही. भाजप २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत येईल”