मोदींचा विजयरथ थोपवण्यासाठी सोनिया गांधींची ‘डिनर पे चर्चा’

टीम महाराष्ट्र देशा : 2019 निवडणुकांसाठी काय रणनीती आखायची यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मोदी सरकारविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधकांना स्नेहभोजनाचे निमंत्रित दिलंय. 17 विरोधी पक्ष या स्नेहभोजनात सहभागी होणार आहे.

तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, समाजवादी पार्टी आणि इतर अशा 17 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण आहे. तेलुगू देसम आणि बसपाला मात्र आमंत्रण दिल गेल नाहीये.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपाचे नेते अखिलेश यादव या डिनर डिप्लोमसीला हजर राहणार आहेत