‘…त्यावेळी सोनिया गांधी रडल्या होत्या’, भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

sonia gandhi

नवी-दिल्ली : भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी काँग्रेस हा दहशतवाद्यांच्या मृत्यूवर रडणारा पक्ष असल्याचे ठाकूर म्हणाल्या आहेत. तसेच एखाद्या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर हे काँग्रेसचे नेते त्यांच्या घरी पैसा देण्यासाठी, दु:ख व्यक्त करण्यासाठी जातात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

यावेळी बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’बाटला हाऊसमध्ये जे झालं त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या होत्या. दहशतवाद्यांच्या मृत्यूवर रडणारा काँग्रेस पक्ष हा कधीच देशभक्तांचा पक्ष असूच शकत नाही. ते कधीच देशभक्तीच्या गोष्टी करु शकणार नाहीत,” असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्यात. “आरएसएसमुळे काँग्रेसला पूर्ण मतांतर करता येत नाहीय, त्यांना दहशतवाद पसरवता येत नाहीय. आरएसएस यावर अंकूश लावत असेल तर ते सत्ता गाजवताय असं नाहीय. आरएसएसची सत्ता नाहीय. पण आरएसएस ही संघटना घराघरात, जन माणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते आरएसएसला त्रासलेले आहेत.’

दरम्यान, छत्तीसगडमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये धर्मांतर होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. हे धर्मांतर रोखण्याचं काम संघ करत असल्याचेही त्या म्हणाल्या. ‘विश्वामधील बंधुत्वाची भावना जिवंत असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आहे. देश आरएसएसमुळे सुरक्षित आहे. कुठेही कोणत्याप्रकार उपद्रवी लोकांपासून आपल्याला शांती मिळते ती आरएसएसमुळे आहे’ असेही म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या