टीम महाराष्ट्र देशा- ‘राज्य पातळीवरील मुद्द्यांबाबत विरोधी पक्षांची भलेही वेगवेगळी मते असतील पण राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं,’ असं मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे. सोनिया गांधी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.स्वत: सोनिया गांधी यांनी या बाबत पुढाकार घेतल्याने दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Meeting of Opposition Party Leaders, chaired by CPP Chairperson, Smt. Sonia Gandhi pic.twitter.com/nBED32h7ep
— Congress (@INCIndia) February 1, 2018
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या लायब्ररीमध्ये गुरुवारी विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष सहभागी झाला नव्हता. अर्थसंकल्पावर सरकारला घेरण्याचे डावपेच आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या या आवाहनामुळे देशात भाजपला नवा पर्याय निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.