भविष्यात नेहरू-गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होईल- सोनिया गांधी

sonia-gandhi-hospitalised-n

नवी दिल्ली: भविष्यात नेहरू किंवा गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती देखील काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकते, असे सूचक विधान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. 2004 मध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली. कारण या पदासाठी ते माझ्यापेक्षा अधिक योग्य होते असं देखील त्या म्हणाल्या .
काय म्हणाल्या सोनिया गांधी –
काँग्रेस पक्षाला एक मोठी परंपरा आहे. या परंपरेनुसार संघटनेतील नेत्यांची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते. यावेळी त्यांनी राजकीय घराणेशाहीबद्दल बोलताना अमेरिकेतील बुश आणि क्लिंटन परिवाराचा उल्लेख दिला. तसेच भारतामधीलही काही राज्यांतील घराणेशाहीच्या इतिहासाचा दाखला दिला. भविष्यात नेहरू किंवा गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती देखील काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकते,उदाहरण द्यायचं झालं तर 2004 मध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली. कारण या पदासाठी ते माझ्यापेक्षा अधिक योग्य होते.Loading…


Loading…

Loading...