सत्ताधारी भाजप विरोधात सोनिया गांधी मैदानात

sonia-gandi

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप विरोधात विरोधकांच्या बैठकीवर बैठकी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीयांची बैठक झाली होती. आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा  सोनिया गांधीं मैदानात उतरल्या आहेत. उद्या १ फेब्रुवारीला सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सगळ्या समविचारी पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण धाडण्यात आलं आहे. शिवाय ९ फेब्रुवारीला सोनियांनी या नेत्यांसाठी डिनरचंही आयोजन केलं आहे.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. ज्याचं नेतृत्व काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी केलं होतं. मात्र या बैठकीला बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. ध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं असून यावेळी संसदेत विरोधकांनी कोणती भूमिका घ्यायची याच नियोजन करण्यासाठी बैठक बोलावल्याचे समजते.Loading…
Loading...