वाचा का मानले सोनिया गांधी यांनी नितीन गडकरी यांचे आभार

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भागातील रस्त्यांचा प्रश्न सोनिया गांधी यांनी मांडला होता, त्याला केंद्रीय भूपृष्ठवहन, रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांनी ‘सकारात्मक प्रतिसाद’ दिल्याबद्दल सोनिया यांनी आभार मानले आहेत.

मार्च महिन्यामध्ये सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 330 ए च्या चौपदरीकरणाबद्दल हे पत्र लिहिले होते. या महामार्गाचा 47 किमी भाग रायबरेली मतदारसंघात येतो. सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 232, 232 ए आणि 330 ए यांचाही चौपदरीकरणाचा विचार करावा असे पत्रात लिहिले होते.

त्यानंतर पाच महिन्यांनंतर 20 जुलौ 2018 रोजी गडकरी यांनी आपल्या विनंतीनुसार तज्ज्ञांद्वारे पाहाणी करुन रायबरेलीतील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या शक्यतेबद्दल कळवले. तसेच सोनिया गांधी यांनी माहिती दिलेल्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण करणे शक्य असल्याचेही त्यांनी पत्रातून कळवले. सोनिया गांधी यांनी याबद्दलच गडकरी यांचे आभार मानले आहेत.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा, शिवप्रताप युवा प्रतिष्ठानची मागणी

1 Comment

Click here to post a comment