सोनिया गांधी या चोर आहेत, निवृत्त मेजरचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये बड्या नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अनेक विरोधकांकडून केला जात असतो. अशाच एका भाजप समर्थकाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चोर आहेत असे म्हंटले आहे. निवृत्त मेजर सुरेंद्र पुनिया यांनी हा गंभीर आरोप केला असून रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

यावेळी सुरेंद्र पुनिया म्हणाले की, नेरेंद्र मोदी यांनी मला संधी दिली तर मला सोनिया गांधीविरोधात रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल. मी आनंदाने हा टास्क स्वीकारेन. ही लढत चौकिदार व चोर यांच्यातील असेल, असे पुनिया यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून 2004 पासून सलग चार वेळा निवडूण आल्या आहेत. त्याच मतदार संघातून मेजर पुनिया यांना निवडणूक लढवायची आहे.