सोनिया गांधी गोव्यात;लुटला सायकल स्वारीचा आनंद

sonia-gandhi-in-goa-

टीम महाराष्ट्र देशा- कॉंग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत असून गोव्यामधून ट्वीट केलेल्या फोटोत त्या सायकलस्वारीचा आनंद लुटत असल्याचं या फोटोवरून स्पष्ट दिसत आहे.सोनिया गांधी यांनी १९ वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर याच महिन्यात राहुल गांधी बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत . मिळालेल्या माहितीनुसार ख्रिसमस च्या पुढच्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी त्या गोव्यासाठी रवाना झाल्या होत्या.

गोव्यामध्ये काढलेला हा फोटो मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.या फोटोवरून त्या रिटायरमेंट विषयी गंभीर असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे तर काहींच्या मते मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यामुळे हवापालट करण्यासाठी त्या गोव्यात गेल्या आहेत.दरम्यान कॉंग्रेसच्या १३३ व्या स्थापना दिवसाच्या समारंभाला देखील त्या गोव्यात असल्या कारणाने अनुपस्थित राहिल्या .त्याच्या गैरहजेरीत राहुल गांधी यांनी पार्टीला संबोधित केले.